मू. जे. महाविद्यालयातील विद्यार्थिनींना स्वयंसिध्दा स्वरक्षण कराटे प्रशिक्षण

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयात युवतीसभेच्या विद्यार्थिनी, युवतींसाठी पाच दिवसीय स्वयंसिध्दा स्वरक्षण कराटे प्रशिक्षण कार्यशाळा झाली. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य विद्याशाखा प्रमुख प्रा.सुरेखा पालवे होत्या.

यावेळी प्रा. सुरेखा पालवे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थिनींनी संकट समयी स्वरक्षण कसे करावे? संकटातून स्वत:चा बचाव कसा करावा? याविषयी मार्गदर्शन केले. याबरोबरच समाजकंटकांशी सामना करताना विद्यार्थिनींना स्वरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. प्रास्ताविक युवतीसभा समिती प्रमुख प्रा. भावना मानेकर यांनी केले. या वेळी संगणक विभागप्रमुख प्रा. हेमलता पाटील उपस्थित आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेत जिल्हा स्वयंसिध्दा प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे यांनी विद्यार्थिनिंना स्वरक्षणाचे विविध प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच विद्यार्थिनीकडून ते प्रात्यक्षिक करून घेतले. याप्रसंगी महिला प्रशिक्षक स्वयंसिध्दा प्राजक्ता सोनवणे आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. एस.एन.भारंबे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्याशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. भावना मानेकर व प्रा. देवेश्री सोनवणे यांनी काम पहिले.

Protected Content