शिक्षणशास्त्र महाविद्यालयात “नवतंत्रज्ञान व कौशल्य विकास” विषयावर मार्गदर्शन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीईच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा झाली. ही कार्यशाळा विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि केसीआयआयएलच्या सहकार्यातून “नवतंत्रज्ञान आणि कौशल्य विकास” विषयावर झाली.

व्यासपीठावर केसीआयआयएलचे सीईओ डॉ.समीर पाटील, केसीआयआयएलचे पोर्टफोलिओ मॅनेजर दर्पण साळुंखे, प्राचार्य डॉ. अशोक राणे, शारीरिक शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ.नीलेश जोशी उपस्थित होते. प्राचार्य राणे यांनी या कार्यशाळेचा उद्देश, महत्व विशद केले.

दर्पण साळुंखे यांनी “न्यू अँड इमर्जिन टेक्नॉलॉजी” या विषयावर मार्गदर्शन केले. नवतंत्र ज्ञानामुळे विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या वाटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्यासाठी सर्वांनी आपल्यातील कौशल्य विकासावर भर द्यावा, असा मोलाचा सल्लाही साळुंखे यांनी दिला. डॉ.समीर पाटील यांनी “ब्लॉक चैन टेक्नॉलॉजी” या विषयावर मार्गदर्शन केले. या टेक्नॉलॉजीचा शैक्षणिक क्षेत्रात कसा वापर करायचा? याबाबतची माहिती डॉ.समीर पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली.

मतदार जनजागृती
लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर “मतदार जनजागृती कार्यक्रम” या विषयावर खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मीडिया कॉर्डीनेटर ज्ञानेश्र्वर वाघ यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक निवडणुकीत मतदान करणे, हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वांनी मतदान करावे आणि इतरांनाही करण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन वाघ यांनी विद्यार्थ्यांना केले. समारोपप्रसंगी समन्वयक उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी कार्यशाळेचा आढावा सादर केला. डॉ पूनम जमदाडे, प्रा.सारिका सोनवणे, डॉ गणेश पाटील यांनी कार्यशाळेचे नियोजन यशस्वीरित्या केले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील प्राध्यापक रुंद आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

Protected Content