गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आगामी सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर आज सोमवार दि. २२ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली  शांतता कमेटी सदस्याच्या बैठकीचे आयोजन  करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप अधीक्षक कुमार चिंता, गणेश महामंडळचे अध्यक्ष  सचिन नारळे हे उपस्थित होते.

 

कोरोना काळानंतर दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर गणेश भक्त यावर्षी सार्वजनिक स्वरुपात निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा  करणार आहेत.  यापार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. या बैठकीत गणेश मंडळांना पोलीस स्टेशन मार्फत देण्यात येणारी परवानगी, पेंडालातील लाईट जोडणी यासह इतर अनेक बाबींसाठी गणेश मंडळांना अडचणी येत असतात या अडचणीचे निवारण करुन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आज जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मंगलम हॉल येथे गणेश मंडळ व शांतता समितीची बैठक संपन्न झाली.  यात गणेश पेंडालात लाईट जोडणी करिता जाचक अटी आहेत. त्या शिथिल करत गणेश मंडळांकडून विद्युत जोडणीसाठी घेतलेली अनामत रक्कम मंडळांनी बिल अदा करताच त्यांना परत करण्यात येईल असे नियोजन प्रशासनाने करावे.  गणेश मंडळांना वीज जोडणी, परवानगी, यासारख्या बाबींसाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात त्यामुळे गणेश मंडळांची हि अडचण दूर करण्यासाठी महापालिका विभाग आणि महावितरण विभाग यांनी समन्वय साधून कामे तत्काळ करुन देण्यात यावी अशा सूचनाही यावेळी डॉ. प्रवीण मुंडे यांनी प्रशासनाला केल्या आहे.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्य देशात जगत असतांना जेवढे आपले अधिकार तेवढ्याच आपल्या जबाबदाऱ्याही आहेत. याची आपण जाण ठेवली पाहिजे अश्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी जमलेल्या गणेश मंडळांना सूचना केल्या. लोक सहभागातून सी सी टी व्ही कॅमेराची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा युवशक्तीचे अमित जगताप यांनी व्यक्त केली. प्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले, मुकुंद मेटकर, भगत बालाणी, राजेंद्र घुगे पाटील, अयाज अली, फारुक शेख, शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक आणि सर्व गणेश उत्सव समिती व मंडळाचे पदाधिकारी तसेच शांतता कमेटी सदस्य उपस्थित होते. अपर पोलीस अधिक्षक श्री चंद्रकांत गवळी यांनी शास्त्राचा दाखला देत प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अमित माळी यांनी तर आभार पोलीस निरीक्षक श्री अरुण धनवडे यांनी मानले.

 

Protected Content