देशभक्ती जोपासली तर सावरकरांच्या स्वप्नातील भारत घडेल – अभिनेता योगेश सोमण

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | “तरुणांनी देशभक्ती जोपासली तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातील समर्थ भारत घडू शकतो. तरुणांनी त्यांच्यामध्ये असलेल्या प्रतिभेचा वापर समर्थ भारत घडविण्यासाठी करावा.” असे प्रतिपादन सिने अभिनेता योगेश सोमण यांनी बहिणाबाई व्याख्यानमालेत केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तारसेवा विभागाच्या वतीने या ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे हे होते.

यावेळी बोलतांना सोमण पुढे म्हणाले की, “आपल्यात प्रचंड आत्मविश्वास व कष्ट करायची तयार असेल तर आपण खात्रीपूर्वक यशस्वी होऊ शकतो. भारतीय लोक देशात व देशाबाहेर मोठया पदांवर काम करत आहेत. मात्र कुठेही गेले तरी देशाची संस्कृती विसरु नये असे ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात प्रा.इंगळे म्हणाले की, “सावरकांचे देशाप्रती प्रचंड प्रेम होते. त्यांच्या पुस्तकातून देशाप्रती अखंड भक्ती जाणवते.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष पवारयांनी तर सूत्रसंचालन कल्याणी महाजन यांनी केले. परिचय डिंपल पवार हिने तर आभार प्रदर्शन वर्षा परदेशी या विद्यार्थिंनींनी केले. या प्रसंगी अनेकांची ऑनलाईन उपस्थिती होती.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!