भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील नाहाटा कॉलेज परिसरात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरूणीचा हात पकडून शिवीगाळ करत विनयभंग केल्याची घटना रविवारी २८ जुलै रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २९ जुलै रोजी रात्री १२.३० वाजता बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील नाहाटा कॉलेज परिसरात १८ वर्षीय तरूणी वास्तव्याला आहे. रविवारी २८ जुलै रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास तरूणी ही दळण दळून घरी जात असतांना संशयित आरोपी विजय योगराज बऱ्हाटे रा.भुसावळ याने मुलीचा पाठलाग केला. त्यानंतर तिचा हात पकडून तिला शिवीगाळ करत विनयभंग केला. पिडीत तरूणीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार पिडीत तरूणीसह नातेवाईकांनी भुसावळ बाजारपेठ पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी २९ जुलै रोजी रात्री १२.३० वाजता संशयित आरोपी विजय बऱ्हाटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भाऊसाहेब पाटील हे करीत आहे.