वाघळी येथे एकाला ४ लाखांचा ऑनलाईन गंडा

चाळीसगाव प्रतिनिधी । बॅंकेतून बोलत असल्याचे भासवून तालुक्यातील वाघळी येथील एकाला चार लाखाचा ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर वृत्त असे की, जयवंतराव रामसिंग सोनवणे (वय- ५१ रा. वाघळी) ता. चाळीसगाव येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. १ ते ५ जानेवारी २०२१ रोजी दरम्यान जयवंतराव सोनवणे यांना अज्ञात नंबरावरून फोन आला. एच.डी.एफ.सी (चाळीसगाव) शाखेतून बोलत असल्याचे भासवून वेळोवेळी अज्ञात नंबरावरून फोन केला. दरम्यान फिर्यादीचा विश्वास संपादन झाल्यानंतर जयवंतराव सोनवणे यांना फोन करून ओ.टी.पी. नंबर घेऊन परस्पर ४ लाखात गंडवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जयवंतराव सोनवणे यांना वेळोवेळी फोन करून अध्याप पावेतो खात्यातून एकूण चार लाख काढले आहेत. फिर्यादीचे ऑनलाईन पध्दतीने फसवणूक झाली आहे. त्या अज्ञात व्यक्तींविरूध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात आज दुपारी २ वाजताच्या सुमारास जयवंतराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे करीत आहेत.

Protected Content