धावण्याच्या कारणावरून तरुणाला तीन जणांकडून बेदम मारहाण 

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदानावर धावण्याच्या कारणावरून तरुणाला  तीन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रविवार 25 डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे आज सोमवार, 26 डिसेंबर रोजी पोलीस प्रशासनाकडून पोलीस मैदानावर धावण्यासह व्यायाम करण्यासाठी मज्जाव करण्यात आल्याच पहिला मिळाला

 

जळगाव शहरातील जानकीनगर भागात तुषार हिरामण सोनवणे वय 24 हा तरुण वास्तव्यास आहे. व्यायाम करण्यासाठी 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पोलीस कवायत मैदानावर गेला होता. यादरम्यान धावण्याच्या कारणावरून तुषार याचा पोलीस लाईन मध्ये राहणाऱ्या अविनाश पाटील यांच्यासोबत वाद झाला. या वादात अविनाश याने त्याच्या दोन मित्रांसह तुषार यास चांपटा बुक्क्यांनी व लाथांनी बेदम मारहाण केले . या महाराणीत तुषार याच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला दुखापत झाली असून तो जखमी झाला. याप्रकरणी तुषारच्या तक्रारीवरून रात्री अविनाश पाटील व त्याचे दोन मित्र अशा तीन जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तुषार जावरे हे करीत आहेत .

Protected Content