वरणगावात कोविंड सेंटर सुरू करा ; शिवसेनेची मागणी

 

 

भुसावळ : प्रतिनिधी । वरणगाव येथे  कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी स्वतंत्र कोविंड सेंटर सुरू करा अशी मागणी भुसावळच्या आणि  स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी  जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे

 

वरणगाव येथे covid-19 पेशंटसाठी  केअर सेंटर व अक्सिजन बेडची सुविधा त्वरित उपलब्ध करण्याची मागणी भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे  केली आहे भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात सुसज्ज  ग्रामीण रुग्णालय आहे वरणगाव शहराला लागून  ग्रामीण भाग असल्याने व खुद्द वरणगाव शहरातील लोकसंख्या पन्नास हजाराच्या जवळपास असल्याने वरणगाव शहरात  त्वरित ग्रामीण रुग्णालयात covid-19  च्या  रुग्णावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कोविंड सेंटर सुरू करण्यात यावे त्यामुळे रुग्णांना भुसावळ व  जळगाव येथे जाण्याचा  त्रास  वाचेल येथील रुग्ण भुसावळ व जळगाव येथे जाऊनही त्यांना आवश्यक  सुविधा मिळत नाहीत

 

वरणगाव शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागाचा विचार करता वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात त्वरित कोविंड सेंटर सुरू करावे येथील स्थानिक व परिसरातील लोकांना दिलासा द्यावा त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत शिवसेनेच्यावतीने करण्यास तयार आहोत  वरणगावच्या  शेजारील प्राथमिक आरोग्य केंद्र कठोरा ,  पिंपळगाव व  वरणगाव येथील  कर्मचाऱ्यांच्या  नियोजनबद्ध नेमणुका करून  हे  उपचार केंद्र सुरू करावे   अशी मागणी शिवसेनेच्या वतीने ई-मेलद्वारे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे करण्यात आली निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी ( भुसावळ ) , तहसीलदार ( भुसावळ ) यांना देण्यात आल्या आहेत  वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी यांनादेखील समक्ष भेटून  निवेदन देण्यात आले

 

या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन , जिल्हा संघटक विलास मुळे,  अल्पसंख्यांकांचे उपजिल्हा  संघटक  सईद मुल्लाजी , उपशहर प्रमुख प्रशांत पाटील ,  राजेन्द्र परसे , राहुल बावणे , निलेश सुरडकर , निलेश कळसकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते

 

Protected Content