शिरसाळा हनुमान मंदिर बंद; भाविकांचे बाहेरूनच दर्शन ! ( व्हिडीओ )

मुक्ताईनगर, पंकज कपले । असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असणार्‍या शिरसाळा (ता. बोदवड) येथील जागृत मारूती मंदिरात आज हनुमान जन्मोत्सव असूनही शासनाच्या निर्बंधांमुळे कुलूप लावण्यात आले आहे. तथापि, अनेक भाविकांनी आज सकाळीच मंदिराच्या बाहेरूनच दर्शन करून आशीर्वाद घेतला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या राज्यात कोरोना विषाणु ने थैमान घातले असल्याने खबरदारी म्हणून शासनाने कडक निर्बंध जाहीर केलेले आहेत. त्यामुळे धार्मिक स्थळे सुद्धा बंद आहेत. याच कारणामुळे बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील प्रसिद्ध असे जागृत हनुमान मंदिर देखील बंद आहे.

खरं तर, हनुमान जन्मोत्सवाला येथे दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी असते. मात्र कोरोनाच्या आपत्तीमुळे लागोपाठ दुसर्‍या वर्षी या पवित्र पर्वावरही येथे तुलनेत शुकशुकाट आढळून आला आहे. मात्र सकाळी काही प्रमाणात फिरण्याची शिथीलता असल्यामुळे भाविकांनी बाहेरूनच मारूतीरायाचे दर्शन घेतले.

आज सकाळी बरेच भाविक मारोती रायचे दर्शना साठी सकाळ पासूनच पायी पायी चालत येतांना दिसले. पंचकृषितील सर्व भाविक ह्या ठिकाणी आपली आस्था घेऊन येतात. आणि त्यांची मनोकामना देखील मारोती राया पूर्ण करतात अशी भक्तांची श्रध्दा आहे. यामुळे कोरोनाच्या संकाटातून मारोती राया नक्कीच बाहेर काढेल असा विश्‍वास देखील त्यांना आहे. सर्व भाविकांना गेटच्या बाहेरुनच दर्शन घेण्यासाठी आवाहन करण्यात आले.

दरम्यान, सध्या लॉक डाऊन असल्यामुळे मंदिर बंद आहे त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये व मंदिर प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. संस्थानचे अध्यक्ष विश्‍वनाथ पाटील, मारूतीरायाचे निस्सीम भक्त मेघराज बाफना नाशिक; हरिभाऊ बोरसे, भागवत पाटील, रामदास दांडगे, बाबुराव पत्रे, पुजारी प्रल्हाद धनगर आदींसह इतरांनी भाविकांसाठी आज बाहेरून दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली.

खालील व्हिडीओत पहा शिरसाळा येथील मारूती जन्मोत्सवाबाबतचा व्हिडीओ वृत्तांत.

युट्युब व्हिडीओ

फेसबुक व्हिडीओ

https://www.facebook.com/508992935887325/videos/539773184097975

Protected Content