यावल | खासगी लक्झरी बसमधून प्रवास करणार्या यावलच्या तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन तरूणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, यावल येथील रहिवासी असणारी एक तरूणी लक्झरी बसमधून जळगावहून पुणे येथे प्रवास करत होती. रात्री दहाच्या सुमारास धुळ्यातील मुकुटी येथे बसमधील दोघा तरूणांनी तिच्याकडे बघून अश्लील हावभाव केले. यामुळे संबंधीत तरूणीने हा प्रकार बस चालक आणि वाहकाला सांगितला.
दरम्यान, या दोन्ही तरूणांनी बस थांबताच पोबारा केला. यातील एक तरूण हा सुनील तायडे या नावाचा असून दुसर्याचे नाव निष्पन्न झालेले नाही. संबंधीत तरूणीने या प्रकरणी पुणे येथील पोलीस स्थानकात तक्रार केली असून हा गुन्हा धुळे येथे वर्ग करण्यात आला आहे. या दोन्ही तरूणांनी मद्यपान केले होते, तसेच ते एरंडोलवरून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.