बंदोबस्तासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या पोलिसांला भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू

बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बंदोबस्ताला दुचाकीवरून निघालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. भरधाव कारने समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघतात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे. बीडच्या नेकनूर परिसरात हा अपघात झाला. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रमेश धोंडीराम नागरगोजे व दिंद्रुड पोलीस ठाण्यातील मच्छिंद्र श्रीधर ननवरे हे दोघे रविवारी सकाळी परीक्षा बंदोबस्ताला दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान नेकनूर परिसरामध्ये त्यांच्या दुचाकीला भरधाव स्विफ्ट कारने समोरून धडक जोरदार धडक दिली.

या अपघतामध्ये रमेश नागरगोजे आणि मच्छिंद्र ननवरे दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यामध्ये मच्छिंद्र ननवरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर रमेश नागरगोजे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान मृत ननवरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता. धडक देणारा स्विफ्ट कार चालक पसार झाला असून त्याचा शोध नेकनुर पोलीस घेत आहेत. यासाठी एक पथक तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Protected Content