जळगाव प्रतिनिधी । शहरातील टागोर नगरात राहणाऱ्या २९ वर्षीय तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील टागोर नगरात राहणारी २९ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहते. काल मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास टागोर नगरात बजरंग पांडूरंग सपकाळे (वय-२९) रा. श्रीराम नगर, जैनाबाद हा तरूणीचा पाठलाग करून तरूणीशी अश्लिल वर्तन करून शिवीगाळ केली. तर चाकूचा धाक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच चाकूने स्वत: अंगावर वार करून जखमी करून घेतले. पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार वागळे करीत आहे.