नियम मोडणाऱ्यांकडून ४ लाखांचा दंड वसूल

रावेर, प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन रात्रंदिवस कार्य करीत आहे . पोलिस प्रशासनही यात मागे नाही नागरिकांना वारंवार सूचना देऊनही मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

रावेर पोलीस स्टेशनतर्फे फिरते पथक नियुक्त केलेले असून आतापर्यंत नियम मोडणाऱ्यांकडून कारवाईपोटी ४ लाख ५७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्व रक्कम पोलीस विभागाने तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडे शासन निधीत जमा करण्यासाठी सुपूर्द केलेली आहे .दरम्यान पेशंटला जेवणाचा डबा पोहचवून वाघोदा येथील मास्क न लावलेले मोटार सायकलवरून जाणारे दोन जण फिरत्या पथकाचे प्रमुख हे. कॉ. भागवत धांडे यांना दिसल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी २५० रुपये घेऊन एकूण ५०० रुपयाची दंडात्मक कारवाई करून पावती फाडण्यात आली आहे. हे कॉ धांडे यांनी ५००/- रुपये घेऊन पावती दिली नाही अशी दुचाकीस्वरांचे म्हणणे चुकीचे आहे असे पोलीस निरीक्षक वाकोडे यांनी सांगितले.

नागरिकांनी कोरोनाबाबत शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे . नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नसून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई यापुढेही सुरूच राहील. नागरिकांनी नियम पाळून स्वतः व इतरांनाही सुरक्षित ठेवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक वाकोडे यांनी केले आहे.

Protected Content