धरणगाव तालुक्यात तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

धरणगाव, प्रतिनिधी । आज रविवार १२ जुलै रोजी दुपारी आलेल्या अहवालानुसार तालुक्यात ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, सकाळी १७रुग्ण आढळून आले होते. आज दिवसभरात २० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

रविवारी आलेल्या दुपारच्या अहवालानुसार तालुक्यात ३ नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यात धरणगाव शहर २ जणांमध्ये मोठा माळी वाडा १,बेलदार मोहल्ला १ यांचा समावेश आहे. तसेच पाळधी खु येथे १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. तालुक्यातील आजवर आढळून आलेल्या कोरोना बाधीतांची एकूण संख्या २६० इतकी झाली आहे. यातील १९ जण मयत झालेत आहेत. तसेच आतापर्यंत १६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर कोविड सेंटरमध्ये ७९ जण उपचार घेताय. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

Protected Content