राजस्थानात राजकीय संकट; अशोक गेहलोतांची धावपळ

जयपूर वृत्तसंस्था । राजस्थानात राजकीय संकट गडद होतांना दिसत असून आपले सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी धावपळ सुरू केली आहे. त्यांनी सर्व आमदारांशी संपर्क करून त्यांना जयपुरमध्ये बोलावून घेतले आहे.

राजस्थान सरकारमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादामुळे सरकार अडचणीत येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. पायलट हे आपल्या समर्थक आमदारांसह नवी दिल्ली येथे निघून आले असल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपने मध्यप्रदेशात ज्या पध्दतीत सत्तापालट केला. अगदी त्याचीच पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होणार का ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

दरम्यान, आज अशोक गेहलोत यांनी कॅबिनेट बैठक घेऊन राज्यातील राजकीय स्थितीबाबत चर्चा केली. त्यांनी सर्व आमदारांशी संपर्क करून त्यांना जयपूर येथे बोलावून घेतले आहे. आमदारांनी मुख्यमंत्री निवासस्थानी येऊन आपली भेट घेण्याचा निरोप पाठविण्यात आला आहे. तर दुसरीकडे, सचिन पायलट यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेऊन अशोक गेहलोत यांची तक्रार केली आहे. यामुळे आता राजस्थानातील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत.

 

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

Protected Content