अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग; दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना सोमवार 1 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी 7 वाजता दोन जणांनी विरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, नशिराबाद गावातील एका भागात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान सोमवार 1 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता सुमारास मुलगी ही आपल्या मैत्रिणीसोबत गावातील शाळेजवळून जाऊन जात असताना गौरव विकास गोसावी आणि शेख रेहान शेख बबलू दोन्ही रा. नशिराबाद यांनी मुलीचा पाठलाग करून त्यांचा विनयभंग केला. दरम्यान याप्रकरणी पीडित मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला त्यानुसार नातेवाईकांनी नशिराबाद पोलीस ठाणे येथे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार गौरव विकास गोसावी आणि शेख रेहान शेख बबलू दोन्ही रा. नशिराबाद यांच्या विरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतळ हे करीत आहे.

Protected Content