यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मोहन बडगुजर यांची तर व्हाईस चेअरमनपदी मराबाई तडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी विविध विकास कार्यकारी सोसाटीत विशेष सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र गाढे हे होते. शेतकरी विकास पॅनलकडून चेअरमनपदासाठी मोहन बडगुजर यांचा तर व्हा.चेअरमन पदासाठी मराबाई तडवी या दोघांचा अर्ज दाखल करण्यात आलेले होते. त्यानंतर दोघांची सर्वानुमते बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. निवड झालेल्या दोघांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील, मोहसिन खान हाजी आसिफ खान, यावल कृउबाचे माजी संचालक विलास पाटील, संचालक अरुण खेवलकर, सुनील नेवे, निंबादास पाटील, आत्माराम तेली, ईश्वर कोळी, संचालिका लीलाबाई मराठे, आशाबाई बडगुजर, मावळते चेअरमन सुर्यभान बडगुजर, माजी ग्रा.पं.विलास काळे, सै. तैय्यब सै.ताहेर ,दिपक पाटील, नबाव तडवी, नुतनराज बडगुजर, ग्रा.पं.सदस्य साहेबराव बडगुजर, खतीब तडवी, बिस्मील्लाखा लालखा, उमेशशेठ वाणी, राजु मराठे, नितीन फन्नाटे, विलास पवार, मंगल सोनार, किसन महाजन, दिलीप बडगुजर, अरूण बडगुजर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.