मोदी लाटेत सर्वच निवडून आले; आता तसे होणार नाही ; ना.महाजन यांच्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ 

धुळे (प्रतिनिधी) मागील निवडणुकीत मोदी लाट असल्यामुळे सर्वच निवडून आले, आता तसे होणार नाही, असे धक्कादायक वक्तव्य राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. एका पत्रकाराने प्रतिक्रिया घेण्यासाठी महाजन यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला असता त्यांनी हे वक्तव्य केले. या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपवरून एका न्यूज पोर्टलने वृत्त प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, महाजन यांच्या या वक्तव्यामुळे या निवडणुकीत मोदी लाट नसेल असेच एकप्रकारे सूचित केल्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

ई टीव्ही भारत  या पोर्टलने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपल्याला तिकीट न मिळण्यामागे पालकमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप केला होता. या आरोपाबाबत एका पत्रकाराने गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना महाजन म्हणाले की,लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी देशाची निवड समिती होती, या समितीने परफॉर्मन्स बघून निर्णय घेतला आहे. या समितीत आपण नव्हतो. गिरीश महाजन यांच्या या उत्तरावर पत्रकाराने त्यांना विचारल की, मागील निवडणुकीत भारती पवार यांचा हरिश्चंद्र चव्हाण यांनी पराभव केला होता, याबाबत बोलताना महाजन म्हणाले, मागच्या वेळी मोदी लाट होती, यामुळे प्रत्येकजण २ लाख, ४ लाख मतांनी निवडून आला होता. यावेळी तसे नसेल. ना.महाजन यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

या लिंकवर क्लिक करून ऐका ना. गिरीश महाजन यांच्या ऑडिओ क्लिपबाबतचा वृत्तांत.

Add Comment

Protected Content