Home Cities जळगाव डॉ.उल्हास कडूसकर यांचे निधन

डॉ.उल्हास कडूसकर यांचे निधन

0
102


kaduskar

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आणि लेखक तसेच जळगाव आकाशवाणी केंद्राला कौटुंबिक श्रुतिका झुंबरच्या माध्यमातून नवीन ओळख करून देणारे डॉ.उल्हास कडूसकर (वय-७२) यांचे आज (दि.२५) सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी डॉ.ज्योती कडूसकर, मुलगा डॉ.प्रशांत व स्नुषा डॉ.सुचित्रा तसेच दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर नुकतीच लिव्हर कॅन्सरची शस्रक्रिया झाली होती. अतिशय सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे वैद्यकीय व्यावसायिक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ख्याती होती. साधी राहणी आणि निगर्वी स्वभाव हिच डॉक्टरांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound