ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याचा केंद्राचा डाव : जितेंद्र आव्हाड ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने एका आयोगाच्या माध्यमातून ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याचा हालचाली सुरू केल्याचा आरोप आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी आज शहरातील केमीस्ट भवनात आज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यासाठी उपस्थित असणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, देशातील सुमारे ५० टक्के जनता ही इतर मागास वर्गात येत असून ती खर्‍या अर्थाने शूद्र आहे. यात बारा बलुतेदार समाजघटकांचा समावेश आहे. मात्र केंद्राने एका आयोगाचा माध्यमातून ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. दरम्यान, त्यांनी विविध मुद्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

या पत्रकार परिषदेत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील व महानगराध्यक्ष नामदेवराव चौधरी हे उपस्थित होते.

पहा : आमदार जितेंद्र आव्हाड नेमके काय म्हणाले ते !

Add Comment

Protected Content