जम्मूसह पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा मोबाइल इंटरनेट सेवा बंद

jammu and kashmir

 

जम्मू (वृत्तसंस्था) जम्मूमध्ये पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबवण्यासाठी रविवारी पुन्हा एकदा पाच जिल्ह्यांमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. एक दिवस अगोदरच या सेवा सुरू करण्यात आल्या होत्या.

इंटरनेट सेवा दुपारनंतर तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पसरवण्यात येणाऱ्या अफवा रोखण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जवळपास पंधरवड्यानंतर शुक्रवार आणि शनिवारी रात्री जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली होती. दोन दिवस अगोदरच जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात आल्यानंतर येथील पोलिस महानिरिक्षक मुकेश सिंह यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व वादग्रस्त मजकूर शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.

Protected Content