राजा वही बनेगा, जो हकदार होगा ! : मनसेने डिवचलं

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करून शिवसेनेला डिवचलं आहे.

राज ठाकरे यांनी झी-२४ तास या वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर शेलकी टीका केली होती. काल सायंकाळी शिवसेना शाखेच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात उध्दव ठाकरे यांनी परतफेड केली. त्यांनी राज यांच्यावर तुफान हल्लाबोल केला. याबाबत अद्याप राज ठाकरे यांनी वक्तव्य केले नसले तरी याआधीच त्यांचे सहकारी संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा ! यासोबत त्यांनी बाळासाहेबांच्या सोबतच राज ठाकरे यांचा फोटो देखील ट्विट केला आहे.

यानंतर आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे विचार हे कोणाचीही प्रॉपर्टी नाही. व्यक्तीवर मालकी हक्क असू शकत नाही.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर फक्त प्रकाश आंबेडकर यांचाच हक्क आहे का? बाळासाहेब यांचे विचार पुढे घेऊन जाणार्‍यालाच जनता आता मान्य करेल. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेत आहेत. राज्यातील जनतेची ही भावना असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले. शिवसेना फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे. मराठी पाट्या, मशिदीवरील भोंगे हे बाळासाहेबांचे विचार होेते आणि तोच विचार राजसाहेब पुढे नेत असल्याचे ते म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: