आमदारांनी गर्वाची भाषा वापरली, अन उशिरा उपरती झाली ; मा.आ. दिलीप वाघ

images 2 1

पाचोरा, प्रतिनिधी | माजी आमदार दिलीप वाघ यांनी आ. किशोर पाटील यांच्या ७० वर्षात १४ आमदारांनी काहीच केले नाही या विधानावर प्रसिद्धपत्रकाद्वारे टीका केली आहे.

प्रसिद्धपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील माजी आमदारांना कर्तुत्व शून्य म्हणून संबोधणारी विधाने आहेत याची उपरती त्यांना उशिरा झाली. केवळ बहुजन समाजाला खूष करण्यासाठी कै. के.एम. पाटील यांना गौरवणारा कार्यक्रम त्यानी जाहीर केला असल्याचा आरोप श्री. वाघ यांनी केला आहे. भावनिक मुद्दे पुढे केले म्हणजे वस्तुनिष्ठ, खरा इतिहास लपवता येत नाही. आ. पाटील यांनी कै. के. एम. बापूंचा गौरव केला तर त्यास आमचा विरोध नसून आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. पण त्यामळे मतदारसंघाचा विकास  घडविणाऱ्या इतर नेत्यांना जाणून बुजून दूर ठेवण्याचा, त्यांचा नामोल्लेख सुद्धा टाळण्याचा दळभद्री आणि हलकटपणा कृतीतून आणि वाणीतून सिद्ध केला. म्हणजे काही विकास कामांचा  इतिहास बदलत नाही. कै. के. एम. बापूंचे कार्यकर्तृत्व निर्विवाद आहे. कै.बापूसाहेबांचे धरणस्थळावर स्मारक उभारण्याची कल्पना आणि धरणाचे नामकरण करण्याचा मनोदय हा काही बापूसाहेबांवर प्रेम असल्याने आमदारांनी व्यक्त केला असे नाही. तर, हे केवळ कै. ओंकारअप्पा आणि त्यांच्या वारसदार कार्यकर्त्यांवर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली कुरघोडी केल्याचे  त्यांनी म्हटले आहे. आ. किशोर पाटील जनतेचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशभरात धरणांची ओळख व्यक्तीच्या नव्हे तर नद्यांच्या नावाने आहेत.  धरणे अथवा मोठे प्रकल्प उभारणाऱ्याची नावे कोनशिलेच्या माध्यमातून पुढच्या पिढीला कळतात. केवळ निवडणूक स्टंट म्हणून असे भावनिक मुद्दे आमदार उपस्थित करीत आहेत. कै.आर ओ. तात्यांनी दहा वर्ष आमदार या नात्याने नेतृत्व केले. ते पूर्वाश्रमीचे काँग्रेसीच होते. स्वतः किशोर पाटील गेल्या पाच वर्षापासून मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. या काळात कधीच त्यांच्यासमोर कै.बापूसाहेबांच्या स्मारकाचा विषय आला नाही असा टोला त्यांनी लागवीला  आहे. काँग्रेस विरोधात संघर्ष करण्यात त्यांच्या घराण्याचा बहुतांश काळ खर्ची पडला. परंतु पाचोरा मतदार संघाचा सार्वत्रिक विकास साधण्यासाठी झटणाऱ्याकोणत्याच नेत्याच्या  कर्तृत्वाला झाकण्याचा उद्योग आम्ही कधीच करणार नाहीत असे स्पष्ट केले.

Protected Content