रणनितीकार प्रशांत किशोर करणार आराम !

नवी दिल्ली | प्रख्यात रणनितीकार प्रशांत किशोर हे आगामी राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याच पक्षाचे काम करणार नसल्याची माहिती समोर आली आहे. तर कॉंग्रेस प्रवेशाबाबत मात्र अजूनही सस्पेन्स कायम असल्याचे दिसून आले आहे.

या संदर्भात एका वाहिनीने दिलेल्या माहिती नुसार प्रशांत किशोर यांनी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला असून पुढील वर्षी मार्चच्या आधी कोणतंही काम हाती न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या आत किंवा बाहेर ती कोणतीही भूमिका ते बजावणार नाहीत. त्यांनी याआधीच आपण जे काम करत होतो त्यामधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. भविष्यात ते काय करणार आहेत याबद्दल सध्या बोलणं जरा घाईचं होईल, असं सूत्राने सांगितलं आहे.

याचा स्पष्ट अर्थ प्रशांत किशोर उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांमध्ये होणार्‍या विधआनसभा निवडणुकांमध्ये कोणतीही भूमिका निभावणार नाहीत. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या विजयानंतर प्रशांत किशोर यांनी निवृत्ती जाहीर केली होती. मी बराच काळ निवृत्तीचा विचार करत होतो, बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने मली ही संधी मिळाली आहे, असं ते म्हणाले होते.

 

प्रशांत किशोर लवकरच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होत्या. २०२४ लोकसभा निवडणुकीआधी पाच राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांकडे सेमी-फायनल म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांचं दूर राहणं विरोधी पक्षांना थोडं सतावणारं आहे.

 

Protected Content