चाळीसगावकरांच्या मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न- आ. उन्मेष पाटील (व्हिडीओ)

चाळीसगावात २० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन

चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षापासून चाळीसगावकरांच्या मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याच्या माध्यमातून करण्यात येत असून या कामाचे भूमिपुजन येत्या २० फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती आ. उन्मेष पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी आमदार उन्मेष पाटील म्हणाले की, या समारंभाचे आयोजन युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले असून या पुतळ्यामुळे चाळीसगाव शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्‍वारूढ पुतळा साठी गेल्या अनेक वर्षापासून शहरातील विविध संघटना संस्था यांच्यामार्फत आंदोलने व मागणी केली जात होती तर संभाजी सेनेमार्फत गेल्या वर्षभरापासून महिन्याच्या प्रत्येक १९ तारखेला नियोजित पुतळाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली जात होती मात्र या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे पुतळा निर्माण करणे ही किचकट प्रक्रिया होती. मात्र आमदार उन्मेश पाटील यांनी चाळीसगाव नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर नॅशनल हायवे नगरपालिकेकडे अवर्गीकृत करून तसेच सदर जागेचा उतारा चाळीसगाव नगरपालिकेच्या नावे करून घेऊन या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये असलेल्या अडचणी युद्धपातळीवर दूर केल्यात व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चाळीसगाव कराना दिलेला शब्द पूर्ण केला असल्याचे त्यांनी या पुतळ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले

अशी असणार शिवसृष्टी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळा बरोबर या ठिकाणी शिवसृष्टी निर्माण केली जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे अनेक प्रसंग असलेल्या घटनांचे चित्र या शिवसृष्टीत असेल. होता जीवा म्हणून वाचला शिवा, तानाजी मालुसरे यांची आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे, रायरेश्‍वर येथील स्वराज्य स्थापनेची शपथ, तसेच अनेक गड किल्ल्यांची माहिती या शिवसृष्टी तून चित्ररूपाने पाहावयास मिळणार असल्याचे आमदार उन्मेश पाटील यांनी यावेळी सांगितले. खासदार ए.टी. पाटील यांचेही या शिवस्मारक निर्मितीस मोठे योगदान राहिले असल्याने त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. पत्रकार परिषदेत खासदार ए टी नाना पाटील भाजपा तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, पंचायत समिती सभापती दिनेश बोरसे, उपसभापती संजय पाटील, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्‍वर पाटील, नगरसेवक नितीन पाटील आदी उपस्थित होते.

यांची असेल उपस्थिती

भूमिपूजन कार्यक्रमास नामदार गिरीश महाजन, खासदार पाटील, आमदार उन्मेश पाटील, माजी केंद्रीय मंत्री एम. के. अण्णा पाटील, सहकार महर्षी उदयसिंह राजपूत, माजी आमदार ईश्‍वर जाधव, माजी आमदार साहेबराव घोडे, माजी आमदार राजीव देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तर या कार्यक्रमाला जि.प. अध्यक्षा उज्वला ताई पाटील, जि प सदस्य पोपट भोळे, पंचायत समिती सभापती सौ स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, महिला आयोग सदस्य देवयानी ठाकरे, भाजपा तालुकाध्यक्ष के बी साळुंखे, नारायण अग्रवाल, डॉक्टर एम. बी. पाटील, अरुण निकम, बाळासाहेब चव्हाण, डॉ. हेमांगी पूर्णपात्रे, बापूसाहेब पाठक, डॉ. विनोद कोतकर, डॉक्टर संजय देशमुख, गौतम झाल्टे, शशिकांत साळुंखे अभय सोनवणे, रमेश आबा चव्हाण, अनिल निकम, दिनेश पाटील, आनंद खरात. श्यामलाल कुमावत घुश्मेश्‍वर पाटील लक्ष्मण शिरसाठ दिलीप घोरपडे गणेश पवार शकील पिंजारी आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दिनेश बोरसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पहा– आमदार उन्मेष पाटील यांनी या पुतळ्याबाबत दिलेली माहिती.

Add Comment

Protected Content