रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | २५ जानेवारी रोजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत तसेच विविध विकास कामांच्या निधी अंतर्गत १) मौजे न्हावी, ता. यावल येथे सुनिल रामदास इंगळे ते अनिल रामदास इंगळे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण – ८ लक्ष २) मौजे न्हावी, ता. यावल येथे ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेस वॉल कंपाऊंड बांधकाम – १० लक्ष, ३) भुसावळ, जामनेर, फत्तेपुर, मोताळा, तरवाडी, पिंपळगाव राजा खामगाव रस्ता सुधारणा करणे – ५०० लक्ष (रस्ता – न्हावी- आमोदा रोड), ४) मौजे आमोदा, ता. यावल येथे नथ्यु देवचंद चौधरी ते मुरलीधर चौधरी यांच्या घरापर्यंत काँक्रीटीकरण – ३ लक्ष, ५) मौजे आमोदा, ता. यावल येथे कायबु रहमान तडवी ते गजानन चिखले यांच्या घरापर्यंत काँक्रीटीकरण – ४ लक्ष, ६) मौजे आमोदा, ता. यावल येथे मागासवर्गीय स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण – ३ लक्ष, ७) मौजे हंबर्डी, ता. यावल येथे बेघर वस्ती ते मराठी शाळेपर्यंत गावांतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण – १० लक्ष, ८) मौजे हंबर्डी, ता. यावल येथे गावाअंतर्गत काँक्रीटीकरण – ५ लक्ष, ९) मौजे हंबर्डी, ता. यावल येथे गावाअंतर्गत काँक्रीटीकरण – ४ लक्ष या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
गावातील विकास कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांनी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे आभार मानले. याप्रसंगी प्रभाकर अप्पा सोनवणे, शेखर पाटील, जुगरा बी. तडवी, सरपंच आमोदा मनिषाताई चौधरी, उपसरपंच अमोदा कलिमा तडवी धनंजय चौधरी व यावल-रावेर तालुक्यातील व परिसरातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.