‘आत्मनिर्भर’ संसदेचे डिझाइन पँटागॉन प्रमाणे ; जयराम रमेश

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । ‘आत्मनिर्भर’ संसदेचं डिझाइन वॉशिंग्टन डीसी येथील पँटागॉन प्रमाणे असल्याची टीका काँग्रेसचे नेता जयराम रमेश यांनी केली आहे. काल नवीन संसद भावनाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते करण्यात आले असू यावेळी मोदी यांनी नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताची साक्ष ठरणारे असेल असा विश्वास व्यक्त केला असता त्यावर जयराम रमेश यांनी टीका केली.

जयराम रमेश यांनी ‘आत्मनिर्भर’ संसदेचं डिझाइन वॉशिंग्टन डीसी येथील पँटागॉन प्रमाणे असल्याचं म्हटलं आहे. दोन्ही इमारतींचं साम्य दाखवण्यासाठी त्यांनी दोन्ही इमारतींचे फोटोही शेअर केलेत. ‘इंग्रजांनी बनवलेल्या सध्याच्या संसद भवनाचं डिझाइन मध्य प्रदेशच्या मुरैना येथील चौसठ योगिनी मंदिराप्रमाणे आहे. पण, नवीन आत्मनिर्भर संसद भवनाची डिझाइन मात्र वॉशिंग्टन डीसी येथील पँटागॉनप्रमाणे आहे’ अशा आशयाचं ट्विट करत जयराम रमेश यांनी टोमणा मारला आहे. जयराम रमेश यांनी सध्याच्या संसद भवन आणि चौसठ योगिनी मंदिराचेही फोटो शेअर केले आहेत.

Protected Content