शिवभोजन थाली केंद्राची मान्यता रद्द करा : शिवसेना महिला आघाडीही मागणी

यावल, प्रतिनिधी । येथील एका बचत गटाच्या नावाने शासनाची फसवणुक करून शिव भोजन थालीचे प्रस्ताव मंजुर केलेल्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून हे शिवभोजन थाली केन्द्राची मान्यता रद्द करावी अशी मागणी शिवसेना महीला आघाडीच्या यावल शहर संघटक सपना घाटगे यांनी तहसीदारांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.

सपना घाटगे यांनी निवेदनात म्हटले आहे की, यावल शहरासाठी राज्य शासनाच्या वतीने यावल येथे फालकनगरमध्ये राहणाऱ्या सुनिता मुरलीधर भावसार ही महीला यावल शहरच्या एसटी आगारामध्ये कायमस्वरूपी कर्मचारी म्हणुन कार्यरत आहे. सदरची महीला ही तालुक्यातील शासनाच्या विविध विभागातील विविध योजनाचे त्यांनी अनुदान घेतले आहे. दरम्यान सुनिता भावसार यांनी विविध महीला बचत गट स्थापन केले असुन एका गटात त्यांनी एकाच घरातील दोन दोन महीलांना समाविष्ट केले आहे. तसेच या गटातील काही महीला या यावल सोडुन बाहेरगावी गेल्या आहेत तर काही महीलांना स्वाक्षरीच येत नाही त्यांच्या नांवाची स्वाक्षरी ते स्वतः करून घेत आहेत. त्या अशा प्रकारे शासनाकडे प्रस्ताव सादर करून तसेच या महिलेने काही अधिकाऱ्यांशी आर्थिक देवाणघेवाण करून शिव भोजन थालीचे प्रस्ताव मंजुर करून घेतले आहे . सदरचे हे मंजुर झालेल्या शिवशक्ती महीला बचत गट यावल संदर्भात संशयास्पद वाटणारे प्रश्न पुढीलप्रमाणे महीला बचत गटाची घटनाप्रत प्रस्तावास सोबत जोडलेली नाही. महीला बचत गट संख्यापक कार्यकारी मंडळ त्यांचे नांव कसे. सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी मान्य केलेली फेरफारचा अहवाल सादर केलेले नाही. त्याचप्रमाणे शिवशक्ती महीला बचत गटाचे ऑडीट आजपर्यंत केलेले नाही . वरील सर्व कागदपत्रे महीला बचत गट संस्था नोंदणीचे कागदपत्रे का घेण्यात आलेली नाही असा प्रश्न त्यांनी उस्थितीत केला आहे. सदरच्या महिलेने आपल्या पतीच्या नांवाने दारिद्रय रेषेखालील कार्ड बनवुन त्या शासनाची फसवणुक करीत आहेत. यावल एसटी आगारात नौकरी करतांना आपल्या वडीलांचे नांव जोडले आहे. तरी शासनाने या सर्व शिवभोजन थाली केन्द्राच्या मंजुरीची तात्काळ चौकशी करून शासनाची चुकीची व अर्धवट माहीती देवुन फसवणुक केल्याप्रकरणी सुनिता मुरलीधर भावसार शिवशक्ती महीला बचत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन सपना घाडगे यांनी यावल येथे नायब तहसीलदार आर .के .पवार यांच्याकडे केली आहे.

Protected Content