रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सांड पाण्याचे पाणी अडविल्याच्या कारणा वरून दोन गटात दगडफेक होऊन त्यात दोन महिला जखमी झाल्या .या प्रकरणी दोघ गटांनी परस्पर विरोधी तक्रारी वरून तालुक्यातील मुंजलवाडी दोन्ही गटातील सुमारे विस जणांविरूद दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंजलवाडी येथे शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेचे सुमारास सुनिल महारु धनगर यांचे घराचे सांडपाणी अडविल्याचे कारणावरून वाद होऊन नंदाबाई हमिद तडवी व पुंडलिक सुका धनगर यांचे गटात एकमेकांवर दगडफेक करण्यात आली यात लिलाबाई पुंडलिक धनगर, नंदाबाई हमिद तडवी या दोन महिला जखमी झाल्या.
याबाबत नंदाबाई तडवी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून उमेश धनगर, संदिप धनगर, गजानन धनगर आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखलं करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटा तर्फे पुंडलीक सुका धनगर यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सर्फराज अल्लाउद्दिन तडवी, शब्बीर शाबीर तडवी , गोलू अल्लाउद्दिन तडवी यांचे सह बारा लोकां विरुद्ध रावेर पोटीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांचे मार्गदर्शना खाली पोहेकॉ . सिकंदर तडवी करीत आहेत.