अमळनेरात रंगला ‘आमदार चषक’ ! : क्रिकेट स्पर्धेला उदंड प्रतिसाद

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सहयोगाने अमळनेर येथे आयोजीत आमदार चषक या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेला अतिशय उदंड प्रतिसाद मिळाला.

आमदार अनिल पाटील यांच्यातर्फे शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आमदार चषक या नावाने आयोजीत करण्यात आली. यात राज्यच नव्हे तर शेजारच्या गुजरातमधील संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा अंतिम सामना दिनांक ६ रोजी पार पडला. गुजरात राज्यातील पार्थटेक्स, सुरत व एमसीए मालेगांव संघ या दोघांमध्ये विजेतेपदासाठी लढत झाली.

अंतिम सामना पाहण्यासाठी प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर प्रचंड न भुतो न भविष्यती अशी गर्दी झाली होती. अंतिम सामना सुरु होण्या आधी आमदारांनी स्वतः फलंदाजी करुन आनंद घेतला. तरुणाईने प्रचंड जल्लोष करत सामन्याचा आनंद घेतला. आ. अनिल भाईदास पाटील स्वतः पुर्ण सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. त्यांनीही तरुणाई सोबत जल्लोष केला. दु.१२वा. अंतिम सामन्यास सुरवात झाली. एमसीए मालेगांव संघाने प्रथम फलंदाजी करत १२८ धावांचे टार्गेट सुरत संघा समोर ठेवले होते. सदर टार्गेट सुरत संघाच्या उत्कृष्ट फलंदाजांनी सहजरित्या पार करत एमसीए मालेगांव संघाला पराभुत केले. एकंदरीत नामांकीत खेळांडूंची धुवांदार फलंदाजी या खेळाच्या निमित्ताने अमळनेरकरांना पहायला मिळाली. अर्थात, यात सुरतच्या संघाने विजेतेपद तर मालेगावच्या चमूने उपविजेतेपद पटकावले. विजेता संघाला १ लाख ११ हजार रुपयांचे प्रथम पारीतोषीक व आमदार चषक तर उपविजेता संघाला ५५ हजार ५५५ रुपयांचे पारीतोषीक व चषक देऊन गौरविण्यात
आले.

सामना आटोपल्यानंतर मैदानावर झालेला जल्लोष पाहण्याजोगा होता. शहरातील प्रतिष्ठीत मंडळी देखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थित झाली होती. यानंतर बक्षिस वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी आमदारांसह खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, कार्योपाध्यक्ष
योगेश मुंदडा, संचालक डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, अध्यक्ष जितेंद्र झाबक, माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील, डॉ. प्रसन्न जोशी, डॉ.शरद बाविस्कर, मुन्ना शर्मा, विक्रांत पाटील, पांडुरंग महाजन, राजु फाफोरेकर, प्रविण जैन, नरेंद्र चौधरी, सुरेश परदेशी,
सचिन बाळु पाटील, ऍड. यज्ञेश्वर पाटील, बंडु जैन, एपीआय विकास शिरोडे, पंकज काशिनाथ वाणी, महेंद्र पवार, रवि पाटील व पत्रकार उपस्थित होते. अतिशय जल्लोषात बक्षिस वितरण पार पडले. यावेळी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षिस वितरण करण्यात आले. यात सानेगुरुजी शाळा विजेता तर जी.एस. हायस्कुल संघ उपविजेता ठरला. तसेच आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत मॅन ऑफ द सीरीज बादल मंगुकिया, बेस्ट बॅट्समन ट्रॉफी चिंतन देसाई, बेस्ट बॉलर ट्रॉफी सेनेले जोसेडलिया, बेस्ट किपर सिद्धेश देशमुख आदींना सन्मानित करण्यात आले.

पुढील वर्षी दोन लाखाचे प्रथम बक्षिस-आमदारांची घोषणा

यावेळी आ.अनिल भाईदास पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना पुढील वर्षी प्रथम बक्षिस दोन लाखांचे प्रथम तर द्वितीय बक्षिस दीड लाखांचे देण्याची घोषणा करताच उपस्थितांनी याला जोरदार टाळ्यांच्या गजरात दाद दिली. यावेळी पुढे बोलतांना आमदार म्हणाले की, सर्वच संघांनी चांगले प्रदर्शन केले. राज्यभरातील जवळपास ३२ संघ यात सहभागी झाले होते. प्रामुख्याने अमळनेर तालुका क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख अभिषेक विनोद पाटील व त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली. जळगाव येथील समालोचक पद्माकर पाटील यांनी संपुर्ण स्पर्धा संपेपर्यंत थांबुन रंगत आणली. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील सामने पाहता येत असल्याने सुमारे २लाखांपेक्षा अधीक शौकीनांनी हे सामने पाहीले.

अशा प्रकारच्या स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडु निर्माण झाला पाहीजे हीच आपली भावना आहे. पुढील वर्षी महिलांची देखील टुर्नामेंट भरविण्याचा आपला मानस असुन त्या सोबतच फुटबॉल, बॅडमिंटन, खो-खो, कबड्डी आदी स्पर्धा घेऊन तरुणाईला मैदानी खेळाकडे वळविण्याचा व त्यांचे आरोग्य सुदृढ करण्याचा प्रयत्न असेल अशी भावना आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त करत उपस्थित क्रिकेट प्रेमींचे आभार व्यक्त केले.
ही स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे प्रमुख अभिषेक विनोद पाटील, गुणवंत पाटील, निलेश महाजन, दत्ता वाणी, रवि पाटील, मिलींद शिंदे, मेघराज महाजन, संदीप सराफ, संजय पाटील, जितेन साळुंके, मंगेश मोरे, ग्राऊंडमन अश्विन पाटील आदींनी परिश्रम घेतले.

सदर आमदार चषक स्पर्धेसाठी आमदारांसह ओमप्रकाश मुंदडा, पंकज मराठे, प्रकाश अमृतकर, स्वादिष्ट नमकीनचे निलेश पाटील, कुसुमाई ग्रुपचे महेंद्र पवार, सुर्या बॅटरीचे नरेंद्र चौधरी, डॉ. अनिल शिंदे, भरत ललवाणी, डॉ. शरद बाविस्कर, भावेश जैन, गौरव पाटील आदींनी सहकार्य केले.

दरम्यान आयोजन समिती प्रमुख तथा अर्बन बँकेचे चेअरमन अभिषेक विनोद पाटील हे लहानपणा पासुन क्रिकेट शौकीन असुन आतापर्यंत झालेल्या अनेक टुर्नामेंट यशस्वी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तरुणाईला मैदानी खेळाशी जुळवुन ठेवण्यात ते नेहमीच प्रयत्नशील असतात. या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी देखील ते आग्रही होते. आमदारांनी त्यांच्यासह संपुर्ण आयोजन समितीला होकार देऊन त्यांचा उत्साह वाढविल्याने या समितीने अतिशय मेहनत घेऊन ही आमदार चषक स्पर्धा यशस्वी केली. उत्कृष्ट आयोजनाबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: