चाळीसगावात आमदार चव्हाणांचा डंका : सर्व ग्रामपंचायतींवर फडकला झेंडा

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींवर भाजप प्रणित पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे. या माध्यमातून आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्यावरील पकड पुन्हा सिध्द केली आहे.

चाळीसगाव  आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड सुरु आहे. काल पार पडलेल्या ११ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले असून बिनविरोध झालेली १ ग्रामपंचायत सह १२ पैकी १२ ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासह शिवसेना उबाठा गट व कॉंग्रेस पक्षाला आपले खातेही उघडता आले नाही.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोठ्या यशानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला व महाविकास आघाडीला पुन्हा मोठा धक्का देण्यात यश मिळाले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे माजी गटनेते शशिकांत साळुंखे यांच्या खेडगाव गावातील पॅनलचा धुव्वा उडवत भाजपा पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार उषाबाई मरसाळे विजयी झाले आहेत तर सदस्य पदांवर देखील ११ पैकी ९ उमेदवार भाजपा पुरस्कृत पॅनलचे निवडून आले आहे. लक्षणीय म्हणजे खेडगाव येथील पराभूत पॅनलचे नेतृत्व करणारे शशिकांत साळुंखे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जुने नेते असून गेली अनेक वर्ष जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीत त्यांचे वर्चस्व राहिले होते. मात्र त्यांना आता दणका बसला आहे..

खेडगाव येथील भाजपा पुरस्कृत पॅनलचे नेतृत्व भाजपचे अविनाश चौधरी, रावसाहेब साळुंखे, के.बी.दादा साळुंखे, पांडुरंग महाजन, सुकलाल माळी, छोटू पाटील, यांनी केले होते.

Protected Content