भाजपकडून जाहीरनामा समिती जाहीर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने जाहिनामा समिती ३० मार्च शनिवार रोजी जाहीर केली आहे. या समितीमध्ये एकूण २७ सदस्य आहेत. या समितीचे संयोजक अर्थमंत्री निर्मला सीतारमन आहे, तर पियूष गोयल हे सहसंयोजक आहे.

भाजप सत्ताधारी ४ राज्यातील मुख्यमंत्र्यांचा या यादीत समावेश आहे. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि छत्तीसगडचे विष्णुदेव साय यांचा समावेश आहे. या सर्वांच्या व्यतिरिक्त अर्जुन मुंडा, किरेन रिजिजू, अश्विनी वैष्णव, शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे आणि स्मृती इराणी या मोठया नेत्यांचाही समावेश आहे.

 

Protected Content