मनोज जरांगे यांची लोकसभा निवडणूकीबाबत मोठी घोषणा

आंतरवाली सराटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूकीबाबत ३० मार्च रोजी आज मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणूकीसाठी मराठा समाजाकडून कोणताही अपक्ष उमेदवार देण्यात येणार नाही अशी जाहीर भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.

यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला जिथे वाटेल की हा उमेदवार मराठा आणि कुणबी एकच आहेत हा कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आमच्या ज्या काही चार ते पाच मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार त्यालाच मराठ्यांनी मतदान करा. कार्यक्रम मात्र शंभरटक्के लावायचा कधीच न पडणारा पाडायचा. लोकांना आधी उमेदवार द्यावा लागतो मात्र आपलं उलटं आहे, आपल्याकडे आधी मत आहेत. मराठा आता हारून देऊ चालणार नाही. या राजकारणाच्या नावाखाली माझी जात राहता कामा नये. तिला मी मातीत मिसळू शकत नाहीत. मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचाय. कोणालामही पाठिंबा नाही, लोकसभेमध्ये ज्यांना पाडायचं त्यांना पाडा. कोणालाही मतदान करा, पण तो सग्या सोयऱ्याच्या बाजूने असला पाहिजे. जो आपल्या बाजूने उभा राहील त्याला मतदान करा, बाकीचे पाडून टाका. तुमच्या आमच्या हट्टापायी जात संपवायची नाही. भावनेचा आहारी जाऊन निवडणुका होत नाहीत. यांना धसकी होती म्हणून यांनी उमेदवार दिला नाही. मी कोणालाही मतदान करणार नाही.

या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी वंचित बहूजन आघाडचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, वसंत मोरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यांच्या सोबत मनोज जरांगे यांच्या युतीची चर्चा ही रंगली होती, परंतू त्यांनी राजकारणापासून दुर राहण्याची घोषणा केली आहे.

Protected Content