रावेर तहसीलाकडून ८ कोटी १५ लाख महसूलाची वसूली

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी यांनी रावेर तहसीलला ७ कोटी ७० लाख रुपयांचे दिलेले महसूलाची वसूलीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाले आहे. रावेर तहसीलने दिलेल्या उद्देष्टा पेक्षा जास्त महसूल वसूल केला आहे. सुमारे ८ कोटी १५ लाख रावेर तहसीलने महसूल वसूल केले आहे. रावेर तहसीलदार बंडू कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार सजंय तायडे यांच्या टीमला जिल्हाधिकारी यांच्याकडून ७ कोटी ७० लाख रुपये टार्गेट देण्यात आले होते.

यामध्ये ०.२९ महसूल शेत सारा मध्ये ४ कोटी १० लाख महसूल वसूली नजराना इतर संकीर्ण वसूलीमध्ये ४ कोटी ४७ लाख वसूल करण्यात आले. गौण खजिन मध्ये ३ कोटी ६० लाख गौण खनिज दंडात्मक कायवाया यातील स्टोन क्रशर, परमिट इतर विभागा कडून रॉयटी म्हणून ३ कोटी ६७ कोटी असे एकूण ८ कोटी १५ लाख रावेर तहसील कडून वसूल करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार तहसीलदार यांनी वारंवार बैठका घेऊन वसूलीचे नियोजन केले आहे. रावेर तालुक्याचा शंभर टक्के वसूलीचा रेपो कायम ठेवला आहे. वसूलीसाठी तहसीलदार बंडू कापसे, अप्पर तहसिलदार मयूर कळसे, निवासी नायब तहसीलदार सजंय तायडे यांच्यासह सर्व मंडळ अधिकारी व तालूक्यातील सर्व तलाठयांचे सहकार्य लाभले.

Protected Content