Home Cities मुक्ताईनगर जिल्हा बँक निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून कार्यकर्त्यांना संधी ; विनोद...

जिल्हा बँक निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून कार्यकर्त्यांना संधी ; विनोद तराळांसह देशमुख यांच्या कन्येचा उमेदवारी अर्ज दाखल

0
27

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आमदार चंद्रकांत  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते विनोद भाऊ तराळ आणि ज्येष्ठ नेते आनंदराव देशमुख यांच्या कन्येने सौ. देव्यानी चंद्रकांत देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या भूमिकेमुळे या उमेदवारींची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना ज्येष्ठ नेते आनंदराव देशमुख, शिवसेना जिल्हा संघटक सुनील भाऊ पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख नवनीत भाऊ पाटील, दिलीप पाटील सर, प्रवीण भाऊ चौधरी, सरपंच रवी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी समर्थकांनी उमेदवारांना शुभेच्छा देत निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी संघटनेतील निष्ठावान कार्यकर्त्यांना प्राधान्य दिल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. राजकीय क्षेत्रात अनेकदा कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली जात असल्याची चर्चा होत असताना, संघटनेत सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.

संघटनेच्या उभारणीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्व करण्याची संधी मिळणे महत्त्वाचे असल्याची भूमिका समर्थकांनी मांडली. त्यामुळे या उमेदवारींकडे केवळ निवडणुकीतील अर्ज म्हणून नव्हे, तर संघटनेतील कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्याच्या निर्णयाच्या रूपातही पाहिले जात आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून कोणती रणनीती आखली जाते आणि विविध मतदारसंघांमध्ये कोणती राजकीय समीकरणे तयार होतात, याकडे लक्ष लागले आहे. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांनंतर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणूक प्रक्रियेत या उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.


Protected Content

Play sound