भाजपचे ‘मिशन बारामती’ ! : निर्मला सितारामन दौर्‍यावर

बारामती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पवार घराण्याचा अभेद्य गड मानल्या जाणार्‍या बारामतीला सर करण्यासाठी भाजपचे ‘मिशन बारामती’ सुरू झाले आहे. या अनुषंगाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तीन दिवस दौर्‍यावर दाखल झाल्या आहेत.

भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे आधीच नमूद केले आहे. या पार्श्‍वभूमिवर, आजपासून पक्षाचे मिशन बारामती सुरू झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुढील ३ दिवस बारामतीच्या दौर्‍यावर आहेत.

या दौर्‍यापूर्वी, सीतारमण यांनी त्यांचा मुक्काम खडवासल्याचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या धनकवडीतील घरी केला. आपल्या दौर्‍यात त्या हॉटेल वा विश्रामगृहात न थांबता पक्षाच्या नेत्यांच्या घरी थांबणार आहेत.
याआधी भाजपचे याआधी भााजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी गेले काही दिवस बारामती लोकसभा मतदारसंघात दौरा केला असून यावेळी आम्हीच बारामती जिंकणार असा दावा केला आहे. यानंतर आता भाजपने आजपासून खर्‍या अर्थाने बारामतीची मोहिम सुरू केल्याचे मानले जात आहे.

Protected Content