चंद्रकातं पाटील रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार

 

पुणे : वृत्तसंस्था| । भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. सामना अग्रलेखात वापरल्या जाणाऱ्या भाषेसंबंधी चंद्रकांत पाटील त्यांच्याकडे विचारणा करणार आहेत.

“शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस होती, त्यावेळी त्यांची भाषा शोभनीय नव्हती. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत. संपादक म्हणून ही त्यांची भाषा असू शकत नाही, मग अग्रलेखात ती कशी? त्यामुळे त्यांना मी पत्र लिहिणार आहे” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “तुम्ही संपादिका आहात..अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली तिथे रश्मी वहिनी असणारं संपादकीय असू शकत नाही”.

औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करणं हा आमचा राजकीय मुद्दा नाही, निवडणुकीचाही नाही, तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं तरी नाव कशाला? ते पहिले हटवा, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली. सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनी मागणी केली, तुम्ही गोधड्या वाळवत आहात म्हणता तर आता करा नामांतर, असंही ते म्हणाले.

Protected Content