क्रांती दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यालयात ध्वजवंदन

जळगाव प्रतिनिधी | क्रांती दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आज पक्षाचे नेते आणि पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून ध्वजवंदन करण्यात आले.

जळगाव जिल्हा व महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिवसा निमित पक्ष कार्यालय आवारात झेंडा वंदन करण्यात आले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर ,जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खडसे, जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील, महिला महानगराध्यक्ष सौ मंगलाताई पाटील, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, संजय पवार , युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, सुनील माळी, युवक अध्यक्ष स्वप्निल नेमाडे, वाय. एस. महाजन, मजहर पठाण, अनिरुद्ध जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content