दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता; सर्वत्र शोध सुरू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील नायगाव येथील २७ वर्षीय तरूण गावातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील नायगाव येथील मुबारक उर्फ सलिम सिकंदर तडवी (वय-२७) हा तरूण आईवडील आणि दोन भावांसह वास्तव्याला आहे. मुबारक उर्फ सलिम तडवी हा गावात कामानिमित्त बाहेर जावून येतो असे सांगून शनिवारी ११ जून रोजी दुपारी १२ वाजता घराबाहेर पडला. दरम्यान रात्री उशीरापर्यंत सलीम हा घरी न असल्याने आईवडीलांनी चिंता व्यक्त केली. त्यांचा सर्वत्र नातेवाईक आणि मित्रांकडे शोध घेतला परंतू तो कुठेही आढळून आला नाही. सोमवारी १३ जून रोजी सलीमचे वडील सिंकदर सबाज तडवी यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. त्यांच्या माहितीवरून यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content