अल्पसंख्यांक आघाडीच्या महिलांचा महायुतीचे उमेदवार आमदार भोळे यांना पाठींबा

WhatsApp Image 2019 10 10 at 7.42.49 PM

जळगाव, प्रतिनिधी | कोंग्रेसच्या पदाधिकारी आयेशाबी पीरजादे यांच्या सह असंख्य अल्प संख्यांक महिला भगिनींचा भाजपात प्रवेश केला. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी. आय (आ.) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांच्या प्रचाराला आता जोमाने सुरवात झाली आहे.

इतर पक्षांच्या मानाने भारतीय जनता पक्षाने आता प्रचारात वेग घेतला आहे. पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील व राज्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी व मुस्लीम भगिनींसाठी ऐतिहासिक काम केले असल्याने तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व शहराचे आ. सुरेश भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मेहरूण येथील दीडशे ते दोनशे अल्पसंख्यांक महिलांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यामध्ये कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आयेशाबी पीरजादे होमेषाबी शेख, नाहेदाबी शेख, फौजीयाबी फातेमा, नसीम बानो, शाहीन बी जहांगीर, शमिनाबी दाउद, शाबेरा बी खान, शगुफा बी. खान, शहनाज बी. खान, फायमी दाबी खान, अ वाहन बी रमजान, माहेर अख्तर बी. शाहेदाबी, जमिनाबी पीरजादे, फिरोज बेगम, नफीस जीयोमोद्दिन, अल्ल्रारखी पीरजादे यांच्यासह असंख्य महिलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आ.सुरेश भोळे महिला आघाडी अध्यक्षा सुरेखा कुलकर्णी यांनी उपस्थित महिलांना भाजपाचा गमछा घालून भाजपात प्रवेश करून घेतला. याप्रवेश सोहळ्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष्य महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांनी सांगितले की, आपण सर्व अल्पसंख्यांक महिला भगिनींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला असून याला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्या प्रमाणे सबका साथ सबका विकास सबका विश्वास या उद्येशानुसार मी सर्व अल्प्संख्यानंक समाजासाठी व बंधू भगिनींसाठी सदैव तत्पर राहील असे सांगितले. अल्प्संखायांक भगिनींनी राजू मामांचा प्रचार घरोघरी जाऊन करण्याचा निर्धार या ठिकाणी केला.

Protected Content