जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील के.सी.पार्क परिसरातील एका भागात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी २ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली आहे. याबबात गुरूवार ३ जुलै रोजी रात्री ८ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील के.सी.पार्क परिसरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. बुधवारी २ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता कपड्यांना प्रेस मारून आणते असे सांगून ती घरातून निघून गेली. त्यानंतर ती घरी परतली नाही. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिच्या बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी ३ जुलै रोजी रात्री ८ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे हे करीत आहे.