अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील एका भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना मंगळवार ६ मे रोजी दुपारी १ वाजता समोर आली आहे. या संदर्भात बुधवारी ७ मे रोजी दुपारी ४ वाजता एकावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील एका भागात अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवार ६ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शुभम किशोर पारधी रा. धरणगाव याने काहीतरी आमिष दाखवत अल्पवयी मुलीला पळवून नेले. दरम्यान ही घटना लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. परंतु मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. दरम्यान त्यांनी शुभम पारधी यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार बुधवारी ७ मे रोजी दुपारी ४ वाजता संशयित आरोपी शुभम किशोर पारधी यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.