Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; एकावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; एकावर गुन्हा दाखल

0
180


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी २१ मे रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २२ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. २१ मे रोजी सकाळी १० वाजता जळगाव तालुक्यातील कठोरा आणि किनोद गावाच्या दरम्यान असलेल्या पेट्रोलपंपाचा जवळून संशयित आरोपी विनोद प्रकाश बाविस्कर रा.सावखेडा याने काहीतरी आमिष दाखवत पीडित मुलीला फूस लावून पळवून नेले. दरम्यान ही घटना तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा शोध घेतला. तिच्याबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर त्याच्या पालकांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी विनोद प्रकाश बाविस्कर याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहे.


Protected Content

Play sound