जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरून परिसरामध्ये पेट्रोल टाकण्यावरून पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मालक समजून चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली तसेच त्याला दमदाटी केली. हा प्रकार गुरूवारी २२ मे रोजी दुपारी २ वाजता घडला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील मेहरुन परिसरातील विशाल हॉटेल पेट्रोल पंपावर संजय नामदेव ढेकणे वय-५४ हे कामाला आहे. गुरूवारी २२ मे रोजी पहाटे चार वाजता दोन दुचाकींवर शिवम सुनील शिंदे, शरद अशोक पाटील, कुणाल पाटील आणि शेखर (पूर्ण नाव माहित नाही) हे चार जण आले आहे. त्यावेळी संजय ढेकणे हे पेट्रोलपंपाजवळ कामावर होते. त्यावेळी चौघांनी संजय ढेकणे यांना पेट्रोल पंपाचे मालक समजूर पेट्रोल भरण्यावरून मारहाण करून दमदाटी केली. दरम्यान या घटनेबाबत ढेकळे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुरुवार २२ मे रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजीव मोरे हे करीत आहे.