माजी गटनिदेशक विलास कुमावत यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा; मान्यवरांच्याहस्ते गौरव


नेरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) मधून गटनिदेशक पदावरून सेवानिवृत्त झालेले नेरी येथील विलास हिरालाल कुमावत यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ सोहळा नुकताच नेरी येथील एका मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला १५०० हून अधिक लोकांची उपस्थिती होती, ज्यामुळे विलाल कुमावत यांच्या कार्याची आणि त्यांच्या मनाच्या श्रीमंतीची प्रचिती आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिल्प निदेशक व आदर्श शिक्षिका ज्योती भोळे लाभल्या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमावत विकास सेवा संस्थेचे नूतन राज्याध्यक्ष प्रफुल्लचंद कुमावत, मा. अध्यक्ष साहेबरावजी कुमावत, उपाध्यक्ष नानाभाऊ कुमावत, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गोकुळ कुमावत, राज्य खजिनदार रघुनाथ बेलदार, पीएसआय राजेंद्र कुमावत, आयुक्त सूर्यकांतजी कुमावत, मातोश्री रंभाबाई कुमावत, धर्मपत्नी सविता कुमावत, सामाजिक कार्यकर्त्या व काउंन्सलर भारतीताई कुमावत तसेच त्यांच्या सर्व बहिणी व मुली व्यासपीठावर उपस्थित होत्या.

मंचावरील मान्यवरांनी विलास कुमावत सरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्याचा गौरव करणारी अनेक वक्त्यांची भाषणे झाली. कुटुंबप्रमुख या नात्याने कुटुंबातील सर्व सदस्यांचा विकास साधण्यात त्यांचे मोलाचे कार्य होते, हे भाषणातून अधोरेखित झाले. राज्याध्यक्ष प्रफुल्लचंद कुमावत यांनी आपल्या भाषणात विलास कुमावत सरांनी समाजातील मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन व बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले. तसेच, कुटुंबातील सदस्यांनी प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ‘विवाह पलीकडील सत्य’ या पुस्तकाची प्रत भेट देऊन स्वागत केले.

जवळजवळ १५०० लोकांच्या जेवणासह सेवापूर्ती सत्कार समारंभाचा हा कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध झाला. भेटवस्तू देऊन समारोप करण्यात आला. ४० गाव येथील आदर्श शिक्षक पुरस्कृत रवींद्र (बापू) कुमावत यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. या प्रसंगी हिरालाल कुमावत, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कुमावत, जळगाव जिल्हा अध्यक्ष संजयजी बेलदार, मा. अध्यक्ष सुरेशजी कुमावत, प्रकाश भाटिवाळ, नायब तहसीलदार विनोद कुमावत, मच्छिंद्र कुमावत, केमिस्ट्री क्लासेसचे संचालक विजय कुमावत सर, लक्ष्मण कुमावत सर, ग्रामपंचायत अधिकारी दिगंबर बेलदार, पं.स. बोदवड केंद्रप्रमुख खंडारे सर, मुकेश कुमावत, लक्ष्मण के. कुमावत, तुळशीराम कुमावत, आर.एन. कुमावत, दत्तात्रय कुमावत, भारत कुमावत, डॉ. दिलीप कुमावत, डॉ. मनोज खंडेलवाल यांच्यासह परिसरातील गावातील समाज बांधव, मित्रमंडळी, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.