पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता पारोळा पोलीस ठाण्यात नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गावात राहणारा सचिन संतोष भोई वय २१ याने पिडीत मुलीला लग्नाचे आमीष दाखवत मे २०२४ मध्ये फूस लावून पळवून नेले. त्यानंत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी ही गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानंतर पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सचिन भोई याच्या विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहे.