Home राजकीय मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर; ३० डिसेंबरला होणार शपथविधी

मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर; ३० डिसेंबरला होणार शपथविधी

0
27

sena congress bjp

मुंबई प्रतिनिधी । काँग्रेसची यादी निश्‍चित झाली नसल्याने मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला असून आता ३० डिसेंबरला शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याआदी २४ डिसेंबर रोजी मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. या अनुषंगाने सोमवारी काँग्रेसचे नेते श्रेष्ठींसोबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत देखील दाखल झाले होते. तथापि, ही यादी अद्याप निश्‍चीत झालेली नाही. यामुळे आता २४ नव्हे तर ३० डिसेंबर रोजी मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामनातून देण्यात आलेले आहे. या दिवशी दुपारी एक वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यात शिवसेना व राष्ट्रवादीतर्फे प्रत्येकी १३ तर काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेणार असल्याची माहितीदेखील या वृत्तामध्ये देण्यात आलेली आहे. यामुळे आज मंत्रीमंडळाचा विस्तार आज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound