जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरापासून जवळ असलेल्या शासकीय आयटीआय महाविद्यालयासमोर रविवारी १२ मार्च रेाजी दुचाकीचा अपघातात जखमी झालेल्या महिला व तीन महिन्याची चिमुकली जखमी झाली होती. मंत्री गिरीश महाजन याचा ताफा जात असतांना अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी अचानक आपला ताफा थांबवून जखमी झालेल्या महिला व चिमुकली यांना ताफ्यातील वाहनामध्ये बसवून उपचारासाठी रवाना केले.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे रविवारी १२ मार्च रोजी आपला ताफासोबत एका कार्यक्रमालासाठी निघाले होते. शहरातील आयटीआय महाविद्यालयासमोर एका दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीस्वारासह महिला आणि तीन महिन्याची चिमुकली जखमी झाले होते. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन याचा ताफा जात येथून जात असतांना त्यांना अपघात झाल्याचे समजले. त्यांनी ताफ्याला थांबवून जखमी झालेल्या महिला आणि तिच्या तीन महिन्याच्या मुलीची विचारपूस केली. जखमी झाल्याने त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाने त्यांनी उपचारासाठी रवाना केले.