मेहरुण येथे हरिनाम कीर्तन सप्ताह, संगीतमय भागवत कथेला प्रारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहरुण प्रभागात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता श्रीमद् भागवत कथा पूजनाने किर्तन सप्ताहाला भाविकांच्या उत्साहात प्रारंभ झाला.

येथील मेहरुण भागामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा (संगीत) चे मंगळवार १५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सर्वजन कल्याणार्थ तसेच जीवनात चैतन्य मिळावे, आध्यात्मिक विकास व्हावा, मानसिक दुर्बलता नष्ट होऊन जीवन सुकर करीत आत्मिक बळ मिळावे यासाठी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाचे २२ वे वर्षे आहे. मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी हरिनाम संकीर्तन सप्ताह उत्सवाचा प्रारंभ झाला.

मंगळवारी सकाळी ९.३० वाजता श्रीमद् भागवत ग्रंथ पूजन माजी महापौर नितीन लढ्ढा आणि माजी नगरसेविका अलकाताई लढ्ढा यांच्या हस्ते झाले. प्रसंगी संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेसह प्रभागातील माजी नगरसेवक सुभद्राताई व सुरेश नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी बोदवड तालुक्यातील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांच्यासह श्रीमद् भागवत कथेतील सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रभागातील नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य व सप्ताह आयोजक प्रशांत नाईक, श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी उपस्थित होते. प्रसंगी महाआरती करण्यात आली. मेहरूण प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content