सैय्यद अहेमद शहीद फाऊंडेशनच्या स्टडी सेंटर व लायब्ररीमुळे अनेक गरजूंची झाली सोय.. !

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील सालारनगरमधील सैय्यद अहेमद शहीद फाऊंडेशन संचलित, ” स्टडी सेंटर अँन्ड लायब्ररी “स सामाजिक कार्यकर्ते तुषार वाघुळदे आणि समुपदेशक नेहा वाघुळदे यांनी सदिच्छा भेट दिली.

भारतीय शिक्षण तज्ञ, भारतीय स्वतंत्र संग्रामातील योद्धे तसेच ज्यांनी भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात मोलाचे योगदान दिले, अशा महान विभूतींचे नाव या स्टडी सेंटर व लायब्ररीला दिले याबद्दल श्री.वाघुळदे यांनी आनंद व्यक्त केला. या स्टडी सेंटरचे मार्गदर्शक मुफ्ती सैय्यद अतिक रेहमान साहब असून समन्वयक हाजी अल्ताफ शेख हे आहेत. “अत्यंत गरजू , होतकरू विद्यार्थ्यांना एक चांगले व आदर्श दालन सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पोषक वातावरण या स्टडी सेंटरमध्ये असल्याने सदर विद्यार्थी नक्कीच भविष्यात उत्तुंग शिखरावर पोहचतील, असे गौरवोद्गार तुषार वाघुळदे यांनी काढले. स्टडी सेंटरचे संचालक रागिब अहेमद यांना शुभेच्छा दिल्यात आणि मनस्वी कौतुकही केले. या स्टडी सेंटर मध्ये १० वी , १२ वी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सोय, करियर गाईडन्स तसेच आदी उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. यावेळी भविष्यातील विविध योजनांवरही सांगोपांग चर्चा झाली.

Protected Content